बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काँग्रेसला आधार’ देण्याचा आम्ही इजारा उचललेला नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबई |  राज्यात काँग्रेसचा मानहानिकारक पराबव झाला आहे. किंबहुना राज्यातल्या जनतेने काँग्रेसला साफ नाकारलं आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला आधार देण्याचा आम्ही इजारा उचललेला नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

काँग्रेस राज्यात समूळ नष्ट झाली. त्याला वंचित बहुजन आघाडीच जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. पण काँग्रेस त्यांच्या कर्तृत्वाने संपली आहे, असं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपून आता आमचं राजकारण सुरु झालं आहे. त्यामुळे काँग्रेसला आता समसमान पातळीवर येऊन बोलावे लागणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

राज्यातली विधानसभा अगदी 4 महिन्यांवर येऊन ठेपलीये. आम्ही काँग्रेससोबत जाणार की नाही ते पक्षाच्या बैठकीत ठरेल मात्र येथून पुढे समसमान पातळीवर चर्चा होईल, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा

-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला नरेंद्र मोदींना फोन!

-तारीख ठरली!!! मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ…

-‘या’ आहेत देशातल्या सर्वांत तरूण खासदार; या मतदारसंघातून झाल्यात विजयी

-मी ‘हे’ काम केल्यावरच पुढच्या विधानसभेला मतदान मागायला जाईन- जगनमोहन रेड्डी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More