औरंगाबाद महाराष्ट्र

…त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट!

बीड |  मुख्यमंत्री म्हणतात एकही डाग नाही बेदाग आहोत. पण मी काँग्रेसला भुरटा चोर म्हणतो पण भाजप संघटित डाकू असल्याने भ्रष्टाचार करतांना पुरावे सोडत नाहीत. भाजप ही संघटित टोळी आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भाजपने एका व्यासपीठावर यावं. मी त्यांना पुरावे देईन असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दोन समाजात फूट पाडून भाजपा राजकीय पोळी भाजून घेत आहे. भाजपचे राजकारण दंगलीशीवाय नाही. भाजप सत्ता मागतोय कशासाठी तर बॉम्ब फोडण्यासाठी. RSS चे मोहन भागवत यांचं नाव बॉम्ब ब्लास्टमध्ये असतानादेखील त्यांना पकडलं नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  ते बीडमध्ये बोलत होते.

शासनाकडे माणुसकी नाही संकटात सरकार आपल्या पाठीशी उभे राहत नाही. मग निवडून का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला. हे सरकार देशाला संकटात टाकत आहे. भाजपचे राजकारण आपल्या हिताचं नाही. काँग्रेस प्रमाणेच भाजपदेखील डागाळलेली आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

भाजपला सवाल करणारा कोणीच नाही. पण आता वेळ आली आहे जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या