बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

अकोला | राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही, कोणाला पकडले जात नाही, या सर्व प्रकारणांकडे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. वंचितच्या वतीने आज सर्व जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, विभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला.

राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले असून नागपूर येथे अरविंद बनसोड तर पुणे येथे विराज जगताप या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच बरोबर औरंगाबाद, जळगाव, रत्नागिरी, परभणी, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मागासवर्गीयांवर हल्ले करण्यात आले. यातील काही प्रकरणात दिखाऊपणाची कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी तर आरोपी पकडलेच गेले नाही. ज्यांना पकडले त्यांना सौम्या कलम लावल्याने ते जामिनावर बाहेर आले तर काही ठिकाणी पीडितांवरतीच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचे एक प्रकारे समर्थन मिळत असल्याने अशा गावगुंडांचे मनोबल वाढत आहे आणि त्यामुळेच अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. कुंभार, पारधी, नाभिक, बौद्ध, मातंग या व इतर समाजाला लक्ष करून मारहाण केली जात आहे, असा गंभीर आरोप करत मारहाणीचा तसंच हल्ल्यांचा निषेध म्हणून आज राज्यभर निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हे सरकार जातीयवादी तर आहेतच मात्र आता धर्मवादी दिसायला लागले आहे. शासनाकडून आमची अपेक्षा आहे की पोलिसांना योग्य तो आदेश देऊन या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख माया कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे उपाध्यक्ष रुपेश उंबरे, प्रवीण गोसावी, वाशी नाका येथे ज्योती यादव, अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे सुनीता डोळस तर पुणे येथे पी.टी. काळे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अमित भुईगल, राजेंद्र पातोडे, सिद्धार्थ मोकल तसेच इतर जिल्हा, तालुका अधक्ष्यानी राज्यातील सर्व तालुका जिल्हा स्तरावर निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध केला, असं आंबेडकर यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

महत्वाच्या बातम्या-

पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

‘घराणेशाही नसेल तर…’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More