अहमदनगर | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्जिकल स्ट्राईच्या राजकारणाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.
सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण योग्य नाही. असे करणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे आणि हे करण्यात मोदी ‘एक्सपर्ट’ असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे. अशा संघटनेशी संबंधित असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहला भाजपने उमेदवारी दिली आहे, असंही ते म्हणाले.
त्यामुळे भारतीयांनी अशा दहशतवादाच्या पाठिशी राहायचं का? याचा विचार करावा, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
-मी लहानपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे दरवेळेस सांगत फिरु का?- अजित पवार
-मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुरीकरांनी माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं- सुजय विखे
-“शेतकऱ्यांचे पैसे थकवणारे मोहिते पाटील मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले होते”
-“दत्तक गावाचा विकास करता आला नाही, तुम्ही देशाचा विकास काय करणार?”
–मी जमिनीवरच आहे मात्र समोरचा उमेदवार जामिनावर आहे- सुजय विखे