“संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हिंसाचाराचे सूत्रधार”

मुंबई | मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि मांजरीतील घुगे हे भीमा कोरेगावमधील हिंसाचाराचे सूत्रधार आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

वरील तिघांनी तरुणांची माथी बिघडवली असून त्यांचं काय करायचं हे सरकारनं पाहावं, असं त्यांनी म्हटलंय. तसेच कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या परिसरातील गावांचं सरकारी अनुदान 2 वर्षांसाठी बंद करावं, अशी मागणीही त्यांनी केलीय. 

दरम्यान, पोलिसांनी हिंसाचार सुरु असताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसेच उद्याचा महाराष्ट्र बंद शांततेत पाळण्याचं आवाहन केलंय.