बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज- प्रकाश आंबेडकर

पुणे | महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील कोटा या ठिकाणी जाऊन अनेक विद्यार्थ्यांना परत आणलं, हे एक चांगलं काम झालं आहे. मात्र यात काही नियोजन असल्याचं दिसून आलं नाही. संवेदनशील असलेल्या शहरातील लोकसंख्या 30 टक्के कमी केल्यास किंवा स्थलांतर केल्यास कोरोनावरती नियंत्रण मिळवता येईल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यासाठी या शहरातील लोकसंख्या कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी किमान तीन दिवसांसाठी महाराष्ट्रापुरतं रेल्वेसेवा सुरू करावी लागेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

भुसावळ, गोंदिया, नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गपर्यंत रेल्वे वाहतूक राज्यातील सीमावर्ती भागापर्यंत चालवण्याची गरज आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या गावी गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन क्वारंनटाईन केल्यावरच त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवावं. असं केल्याने गावकऱ्यांमध्ये अशा लोकांप्रती भीती राहणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय- विराट कोहली

परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

महत्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानी यांचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला हा निर्णय

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर केलेलं ट्विट अमिताभ बच्चन यांच्याकडून डिलीट!

गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More