मुंबई | राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं मी बाळा नांदगावकर यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही ते मला माहित नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. यावरच प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रियी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
जे त्यांच्या पक्षात जाणार नाहीत, त्यांनाही असाच त्रास सुरु केला जाणार आहे. पण राज ठाकरे याला बळी पडतील, असं मला वाटत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, भाजपकडून ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत- धनंजय मुंडे
-आयसिसचे पाच दहशतवादी भारतात; देशभरात हायअलर्ट जारी!
-पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा पत्ता कट???
-नाना पाटेकर अमित शहांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
-पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा
Comments are closed.