बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात- प्रकाश आंबेडकर

पुणे | राज्यात लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर त्याचं नाव न घेता केली आहे.

राज्यात काँन्ट्रॅक्ट फार्मिंग कायदा करण्यापासून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थांबवू शकलो नाहीत. कृषी हा राज्याचा विषय आहे. राज्यातील कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

तीन पायाच्या सरकारला हा कायदा रद्द करण्यात काय अडचण आहे?, असा सवाल आंबेडकरांनी केला. जमिनी वाचवायच्या असतील तर काँन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि शेती मालकांचा संबंध काय?, हे एकदा केंद्राने जाहीर केलं पाहिजे, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केलं.

दरम्यान, मला शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला दिल्लीत का जात नाही म्हणून विचारलं जातं. पण माझा लढा राज्यात असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सचिनच्या घराबाहेर बॅनरबाजी करणाऱ्या ‘स्वाभिमानी’ मुलाचं नेमकं म्हणणं काय? पाहा व्हिडीओ-

मग मनमोहनसिंग यांचा जीएसटीचा कायदा का मंजूर केला नाही?- नाना पटोले

नवऱ्यानं बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?’; ‘स्वाभिमानी’ पोराचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More