Top News अकोला महाराष्ट्र

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही?- प्रकाश आंबेडकर

अकोला | कोरोना लसीच्या मोहिमेला देशभरात सुरूवात झाली. पंतप्रधानांनी देशात तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात लसीकरणाला प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लसीबाबत सवाल केला आहे.

पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही काेराेनायाेद्धा असतानाही त्यांनी लस का घेतली नाही, असा सवाल वंचित प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आजवर लसीकरणाचे अनेक टप्पे मी पाहिले आहेत. यापूर्वी लसीकरण झाले त्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी आधी लस घेतली असून, लोकांना विश्वास दिला हाेता. आता मात्र केवळ ढाेल वाजविण्याचे प्रकार सुरू असल्याचं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, प्रमाणे जुन्या काळात राजा शिकारीला जात असे तेव्हा ढाेल वाजविले जात हाेते. तसाच प्रकार आता सुरू आहे. लससंदर्भात अनेक शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत, असंही आंबेडकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा

“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”

“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”

“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या