बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?”

मुंबई | काही दिवसांपुर्वी निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार हे नोव्हेंबरपासून सांगण्यात येत होते. परंतु केंद्र व राज्य सरकार दोघांनीही दुर्लक्ष केलं आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कोणतीही सोय सरकारने केली नाही. ज्यामुळे कोरोनाने अनेक लोक दगावले आहेत. मद्रास उच्च न्यायलयाने निवडणूक आयोगाला विचारल्याप्रमाणे यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

देश कोरोनाशी लढा देत असतानाही राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली होती. तसेच, निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,  असं म्हणत मद्रास उच्च न्यायलयाने संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर भारत कोरोना विरूद्धची लढाई लवकरच जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा वाढला

“लसीकरणात भारतालाच प्राधान्य, भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही”

खरंच वाफ घेतल्याने कोरोना बरा होतो का?; जाणून घ्या वाफ घेण्याचे फायदे आणि तोटे

‘म्युकरमायकोसिस’वर उपचारांसाठी पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

भारतात लसींचा तुटवडा; दुसरीकडे ‘या’ देशात लोकसंख्येच्या 5 पट लसींचा साठा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More