मनोरंजन

‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

मुंबई | जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे येणार आहे.

यासंदर्भात स्वत: अमिताभ बच्चननं ट्विटरवरुन माहिती दिली आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन विलक्षण माणसांचा सहवास लाभणं ही सन्मानाची बाब आहे. कोणीही विचार करु शकत नाही, असं त्यांचं आयुष्य आणि आदिवासींसाठी काम आहे. केबीसीच्या कर्मवीर भागासाठी ते माझ्यासोबत आहे., असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

दरम्यान, त्यांच्या ट्विटला डॉ. प्रकाश आमटे यांनी रिट्वीट करुन येत्या 7 सप्टेंबरला हा भाग प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल

-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे

-‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या