ओबीसी विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतही आरक्षण!

मुंबई | ‘एनसीईआरटी’च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत आता ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यापूर्वी एससी, एसटी आणि अपंगांना आरक्षणाची तरतूद होती. आता यामध्ये मागासवर्गीयांचाही समावेश करण्यात आला आहे. 

एनटीएसईच्या शिष्यवृत्तीतही वाढ होणार असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. यापूर्वी 1 हजार रुपये शिष्यवृत्ती होती ती यापुढे 2 हजार रुपये मिळणार आहे. तसेच पीएचडीच्या शिष्यवृत्तीतही यूजीसीच्या नियमांप्रमाणे वाढ होणार आहे.