मुंबई | भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कारण या व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रूग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दिल्ली आणि हैदराबादमध्ये कोरोनाचे दोन नवे रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवरून उपाय सांगितला आहे.
एक कप गरम पाण्यात लिंबू घालून ते पाणी प्यायल्याने करोनापासून बचाव होऊ शकतो, अस प्रकाश राज यांनी ट्विट करत म्हटलं. मात्र नंतर काही वेळाने प्रकाश राज यांनी हे ट्विट डिलिट केलं.
एखादं चांगलं काम करण्याच्या नादात मी चुकीच्या माहितीचा शिकार झालो. पण चांगली गोष्ट आहे की मी माझी चूक सुधारली. त्यामुळे मी चुकीचं टविट डिलिट केलं, असं प्रकाश राज यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रकाश राज यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी दिलेल्या उपायामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्या चांगलाच समाचार घेतला.
_In my eagerness to do good, I fell victim to wrong info. But the good thing is that I accept evidence and correct myself. Hence I’ve deleted the erroneous tweet_. SORRY 🙏🙏
— Prakash Raj (@prakashraaj) March 4, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“हा केतकर दररोज कांबळे-पवार यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो”
देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा मोठा झटका!
महत्वाच्या बातम्या-
‘विधानसभेत लोकायुक्त कायदा मंजूर करा’; अण्णा हजारेंचं उद्धव ठाकरेंना पत्र
योगींसोबतच्या त्या चर्चेत काय झालं?; संजय राऊत सांगतात…
मला परत खासदारकी द्या; रामदास आठवलेंची जे.पी. नड्डांना विनंती
Comments are closed.