बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा- प्रकाश राज

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपने 200 जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल असं चित्र आहे. या निकालावरून प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपनं जोर लावला होता. भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ममता बॅनर्जी निवडणुकीला उभ्या असलेल्या जागेवर अनेकांचं लक्ष आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी विजयी होणार का की सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींचा पराभव करणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये भाजपने आसाममध्ये सत्ता आणण्यात यशस्वी असलं तरी सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र मोदी-शहांची जादू चालली नाही.

 

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झाला पराभव- चंद्रकांत पाटील

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज ठरला खरा, दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More