बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

अकोला | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शिवसेनेच्या जवळ जात असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर वाढल्याचं चित्र आहे. पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरल्यानं महाविकास आघाडीत फुट पडण्यास सुरवात झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यातील समीकरणं बदतील का काय अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अकोल्यात नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं देखील नाना पटोले म्हणाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक काँग्रेसला सतावत असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी मिळावी त्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, अशा कानपिचक्या नाना पटोले यांनी घेतल्या आहेत. तर आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नाही, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

3 जिल्ह्यात अतिवृष्टी तर कोकणातल्या या जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता, घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान!

“भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी”

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु- नाना पटोले

‘नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही’; नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना दम

छोरी धाकड है! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More