राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

मुंबई | लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं होतं. या वक्तव्यावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणत असलेल्या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो. राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवून समाजात भय निर्माण करायचे. त्यातून सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी मागील महिन्यात पुण्यातील सभेत म्हटलं होतं. 

दरम्यान, विक्रोळी येथील सभेत राज ठाकरेंनी हाच मुद्दा मांडला. त्यावर शिवसेनेनं आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

-‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या

-कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या आरोपाच्या भूमिकेशी मी सहमत- शरद पवार

-भिडे गुरुजींनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट