मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्माचं निमंत्रण स्वीकारल्यामुळंच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देण्यात आला आहे, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते आझम खान यांनी केला आहे.
मुखर्जींना संघाने कार्यक्रमाला बोलावलं. काँग्रेसचे असूनही ते कार्यक्रमाला गेले. त्याची परतफेड संघाने भारतरत्न देऊन केली, असं त्यांनी म्हटलं आहे.
भारतरत्न हा संघाने मुखर्जींना दिलेला ‘आहेर’ आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला प्रणव मुखर्जी, सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि संगितकार भूपेन हजारीका या तिघांना भारतरत्न जाहीर झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रियांका गांधी पंतप्रधान होणार; 2004ची भविष्यवाणी ठरणार खरी?
-विद्यार्थिंनीवर पैसे उधळणारा पोेलीस व्हायरल, प्रजासत्ताक दिना दिवशीची घटना
-“शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतकी का घाबरते?”
-अबब…सुपरमॅनलाही लाजवेल असा हार्दिक पांड्याचा झेल, विराटही झाला अवाक
-बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ नाईलाजाने देण्यात आला- असदुद्दिन ओवैसी