मुंबई | हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे आणि फाईल बंद केली पाहिजे, असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. या कारवाईमुळे समाजातल्या गुन्हेगारांना चाप बसेल, असंही त्या म्हणाल्या.
हैदराबाद पोलिसांचं मी अभिनंदन करते. पीडितेच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. जेव्हा कधी पोलिसांवर अशी चकमक करण्याची वेळ येते. तेव्हा सरकारने ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि फाईल बंद केली पाहिजे, असं प्रणिती म्हणाल्या.
पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत. तर काहीजण पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
बाबासाहेबांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित; उद्धव ठाकरेंचा निर्णय- https://t.co/DkpMthcPcW @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) December 6, 2019
हैदराबादमध्ये जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे- मनेका गांधी- https://t.co/FQZ56027Ve @Manekagandhibjp @ArvindKejriwal
— थोडक्यात (@thodkyaat) December 6, 2019
एन्काऊंटरचा तपास झालाच पाहिजे; असदुद्दीन ओवैसी यांची मागणी https://t.co/Iytbe29YZh @asadowaisi #hyderabadpolice #HyderabadEncounter
— थोडक्यात (@thodkyaat) December 6, 2019
Comments are closed.