महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 सोलापूर

प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार; मेकअप बॉक्स वाटल्याचा आरोप!

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते, असा आरोप नरसय्या आडम यांनी केला.

मतदारांना मेकअप बॉक्स देऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आडम यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन तथ्य आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन दिलं.

आडम मास्तरांना लेखी तक्रार देण्यास सांगितलं आहे. पोलिसांमार्फत चौकशी करुन कारवाई करु, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या