महाराष्ट्र मुंबई

“…जर असं झालं तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू”

मुंबई |  2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाल्यास पंतप्रधान म्हणून नितीश कुमार यांना पुढे आणण्याचा मानस जदयूचे नेते आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे बोलुन दाखवला असल्याचं कळतंय.

नुकतीच ‘मातोश्री’वर प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा केली.

थोड्याशा जागंसाठी भाजपबरोबर असलेली युती मोडू नका, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी शिवसेना पंतप्रधानपदासाठी नितीश कुमारांचं नाव पुढे आलं तर त्यांच्या नावाला पाठिंबा देणार का? अशा चर्चां रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळे Vs विजय शिवतारे असा सामना रंगणार?; भाजपची शिवसेनेला सूचना

“…तर मराठा समाज ओवैसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही”

राज ठाकरेंची व्यंगचित्र सभांपेक्षा परिणामकारक; छगन भुजबळांची स्तुतीसुमनं

“गडकरींच्या मनात तसेे काही असते तर ते मला बोलले असते”

मुलाच्या लग्नानंतर आता राज ठाकरे लावणार 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या