देश

“बिहारमध्ये नागरिकत्व कायदा लागू होणार नाही”

Bihar CM Nitish Kumar talks to mediapersons and answers the questions and queries raised by PM Narendra Modi in Patna on Tuesday. Express Photo by Prashant Ravi. 01.09.2015.

पाटणा | केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नागरिकत्व दुरस्ती कायद्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशातील बिगर भाजपशासित राज्यांनी या कायद्याला तीव्र विरोध केला. यातच आता केंद्र सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या जेडीयूने या कायद्याला विरोध केल्याने केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार नसल्याचं जेडीयू नेते प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. जेडीयू नेते प्रशांत किशोर यांनी हे ट्विट करून थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच आव्हान दिलंय. जेडीयूचे उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांनी रविवारी हे ट्विट केलं असून बिहारमध्ये नागरिकत्व आणि एनआरसी हे केंद्र सरकारचे दोन्ही कायदे लागू होणार नसल्याचंही म्हणारे आहेत.

Loading...

प्रशांत किशोर यांच्या या ट्विटमुळे जेडीयूमध्ये संभ्रम पसरला आहे. जेडीयूने नागरिकत्व संशोधन कायद्याला पाठिंबा देत भाजपला मदत केली होती. जेडीयूने लोकसभेत आणि राज्यसभेत घेतलेल्या भूमिकेविरोधात प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वीच केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात नवीन नागरिकत्व कायदा लागू करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणं सर्व राज्याला बंधनकारक आहे, असं वारंवार केंद्र सरकारने या कायद्याचं समर्थन करताना म्हटलंय.

 

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...

ताज्या बातम्या