नवी दिल्ली | नरेंद्र मोदींनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत ‘ओडिशाचे मोदी’ अशी ओळख असणारे प्रताप चंद्र सारंगी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
ओडिशाचे 64 वर्षीय सारंगी यांचे राहणीमाण अत्यंत साधारण आहे. त्यांनी आपला प्रचारही सायकलवरुन केला होता. प्रचारासाठी त्यांनी काहीही खर्च न केल्याचं बोललं जातंय.
सारंगी यांच्या जीवनशैलीची तुलना नरेंद्र मोदींशी केली जाते. त्यांनी लहानपणीच संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या विधवा आईच्या सेवेसाठी ते घरी परत आले.
सारंगी हे भाजपच्या तिकीटावर दोनदा आमदार बनले आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकीत ते बालासोर मतदारसंघातून बीजेडी उमेदवाराला पराभूत करत खासदार झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांना पाचव्या रांगेत जागा, पवार शपथविधीला गेलेच नाहीत!
-प्रकाश आंबेडकरांना पराभूत करणाऱ्या ‘या’ खासदाराने घेतली मंत्रीपदाची शपथ
-…अन् यावेळी रामदास आठवलेंनी न चुकता घेतली मंत्रीपदाची शपथ
-रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ; प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी??
-नरेंद्र मोदींच्या मातोश्रीने घरात बसून अनुभवला मुलाचा शपथविधी सोहळा
Comments are closed.