उस्मानाबाद महाराष्ट्र

“राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही”

उस्मानाबाद | विधान परिषदेतील जागा या राजकीय जागा नाहीत. तर त्या साहित्यिक, पत्रकार यांच्या आहेत. तसेच राजकीय नेत्यांची सोय लावण्याची ही जागा नाही, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला लगावला आहे.

राज्यपालांनी कुणाला नियुक्त करावं याचे काही संकेत आणि परंपरा आहे. संविधान आणि राज्यघटनेनं राज्यपालांना जे अधिकारी दिले आहेत. त्या चौकटीत राहून राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील, असं दरेकर म्हणाले.

सरकारने निश्चित केलेल्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याने दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

“जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही, तोपर्यंत ती भरू नका”

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड; भारती सिंह आणि पती हर्ष ताब्यात

“…त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या