“शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”
मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसह एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार व एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काही तोडगा निघत नाहीये.
संतप्त संपकरी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर दगडफेक, चप्पलफेक करत हिंसक आंदोलन केलं. हा हल्ला भाजपनेच (BJP) घडवून आणला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. राऊतांनी केलेल्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ईडीची (ED) कारवाई झाल्यामुळे राऊत वाट्टेल ते आरोप करत आहेत. प्रसिद्धीसाठी ते काहीही करू शकतात. पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा संजय राऊत यांचा प्लॅन नव्हता ना याची चौकशी व्हावी, असा घणाघाती आरोप प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) केलं आहे.
दरम्यान, अस्वस्थ, अशांत, अतृत्प आत्म्यांनी हा हल्ला घडवला असल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तर तुम्ही सुद्धा आरशाच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला होता.
थोडक्यात बातम्या-
18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार बूस्टर डोस, मोजावे लागणार ‘इतके’ रूपये
पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त 100 रूपयांपासून करू शकता गुंतवणूक
‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
कार्डशिवायही काढता येणार एटीएममधून पैसे, आरबीआयने केली मोठी घोषणा
“कर्म याच जन्मात फेडावे लागतात, यातून कोणीच वाचत नाही”
Comments are closed.