बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुळशी तालुक्याची रग दाखवा, आपण कंपनीत घुसून…; मुळशीतील घटनेवर प्रविण तरडे संतापले

पुणे | पुण्यामध्ये मुळशी तालुक्यातीस उरवडे गावाजवळील एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत या 18 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या ठिकाणी अभिनेते प्रविण तरडे यांनी भेट दिली. पाहणी केल्यावर प्रविण तरडेंनी संताप व्यक्त केला आहे.

आपण एक काम करू आता जर आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत काम करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहू द्या. आता कंपनी लोकांनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे, असं प्रविण तरडे म्हणाले.

प्रत्येक मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला मी विनंती करतो जा कंपन्यांच्या आत आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करत आहेत. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरानी, वर्षानी आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?, असंही प्रविण तरडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मदत जाहीर केली आहे. तर केंद्र सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर नवनीत राणा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

आजोबांचे व्हायोलिन स्किल्स पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More