बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ट्रोलिंग थांबवा अन्यथा भाजप कार्यकर्ते जशाच तसं उत्तर देतील”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून खालच्या भाषेत होणारं ट्रोलिंग रोखावं, अशी मागणी भाजप नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली.

काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपची सहनशीलता दुर्बलता समजू नये. ट्रोलिंग थांबवा अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचं राजकारण करतंय का अशी शंका निर्माण होत आहे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

‘…म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही’; कमलनाथांनी केला मोठा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

“ट्रोल्सच्या जनकांना ट्रोलर्सविरोधात तक्रार करण्याची वेळ येणं हा नियतीचा खेळ”

निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More