बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय- प्रविण दरेकर

मुंबई | मंत्री नवाब मलिकांनी सकाळीच स्फोटक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आणि त्यांचा मोर्चा भाजप नेत्याकडे वळवला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तिसोबतचा फोटो ट्विट करत ती व्यक्ती ड्रग्ज पेडलर जयदीप राणा असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिकांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर आता भाजप नेत्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली. भाजप नेते किरीट सोमय्या, निलेश राणेंनंतर आता विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे.

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसत असल्याचा खोचक टोला प्रविण दरेकरांनी लगावला आहे. रोज उठलं की कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्याआधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशी मलिकांची सध्याची कामगिरी आहे, अशी खरमरीत टीका दरेकरांनी केली आहे.

मंत्री म्हणून शपथ घेताना गुप्ततेच्या बाबतीत संविधानाने ज्या चौकट आणि अटी घालून दिल्या आहेत त्याचा भंगही मलिकांकडून होत असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही दरेकरांनी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर

‘त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेल’; देवेंद्र फडणवीस आक्रमक

“त्यांना समीर वानखेडेंची एवढी आपुलकी का वाटतीये?”

“दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मोदींच्या मंत्रिमडंळात कसा?”

अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More