महाराष्ट्र मुंबई

सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या आहेत- प्रवीण दरेकर

अलिबाग | सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या आहेत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं त्या कोकणाला मदत देताना उद्धव ठाकरे हात आखडता घेत आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळात बाधित झालेल्या बागायतदारांना झाडांच्या संख्येनुसार मदत मिळायलाच हवी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. ते अलिबागमध्ये बोलत होते.

कोकणातील बागायतदारांना हेक्टरी 50 हजार मदत शासनाने देऊ केली आहे. ही मदत अपुरी आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येनुसार बागायतदारांना मदत द्यावी. बागायतदारांना लागवडीसाठी मोफत रोपं उपलब्ध करून द्यावी, रोजगार हमी योजनेतून बागांच्या साफसफाईसाठी मजूर उपलब्ध करून द्यावेत, असं दरेकरांनी म्हटलंय.

काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे योग्य प्रकारे झालेले नाहीत अशा तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांची पुन्हा एकदा पडताळणी करावी. महावितरणकडून देण्यात आलेल्या वाढीव बिलांची फेरपडताळणी व्हावी, ग्राहकांकडून दंड आकरला जाऊ नये, असंही दरेकरांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सॅनिटायझर प्यायल्याने नागपुरात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

#DoctorsDay- ‘कोरोनासारख्या संकटाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना सलाम’

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

राज्यात आज ४८७८ नवीन रुग्णांचे निदान तर रिकव्हरी रेट ५२ टक्क्यांवर कायम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या