Top News राजकारण

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

मुंबई | वीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. दरम्यान यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उर्जामंत्री निती राऊत यांच्यांवर टीका केलीये.

नितीन राऊत यांनी बिलं तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावलाय.

प्रवीण दरेकर म्हणाले, “नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं. राऊत बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसले की त्यानंतर आम्ही बिल तपासण्यासाठी आणू.”

ग्राहकांना जी बिलं पाठवलीयेत ती योग्य कशी आहेत ते पटवण्यासाठी मेळावा घेतायत. मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि ऊर्जामंत्री एकत्रित बसून काही मिनिटांत हा मुद्दा सोडवू शकतात. मात्र, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचंही दरेकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या