बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत, असा टोला प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आम्ही रस्त्यावर उतरूच. तुम्ही मातोश्रीत बसून होतात. त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. पण तुम्ही लोकांमध्ये जा आणि लॉकडाऊनमुळे होणारं त्यांचं नुकसान समजून घ्या, असा सल्लाही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

प्रविण दरेकरांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जिंतेद्र आव्हाड यांचाही जोरदार समाचार घेतला आहे. आव्हाड म्हणतात 20 लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहवं. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे, असा दावा प्रविण दरेकरांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला

बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!

स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू!

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सक्तीचा आराम करण्याची डॉक्टरांची सूचना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More