बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चौकशांना मी घाबरत नाही”

मुंबई | मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गेल्या पाच वर्षातील अनियमिततेची गंभीर दखल घेत बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. यानंतर सरकारच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकरांनी आज मुंबईत आक्रमक अंदाजात पत्रकार परिषद घेतली.

मुंबै जिल्हा बँकेला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार पण आता राष्ट्रवादीने देखील पुढच्या सामन्याला तयार रहावं. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जिल्हा बँकांच्याविरोधात मी ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.

एकट्या प्रवीण दरेकरांची बँक नाही. यात राष्ट्रवादीचे 6 संचालक आहेत. यामध्ये शिवाजीराव नलावडे, अजितदादांच्या जवळचे सहकारी सिद्धार्थ कांबळे या बॅंकेत आहेत. तसंच सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर हे देखील आहेत. मग कारवाई झाली तर केवळ प्रवीण दरेकरांविरोधात होणार नाही. तशी सुतराम शक्यताही नाही. पण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं म्हणून मुंबै बँकेची चौकशी सुरु केलेली आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी घेतलेला आहे. अशा चौकशांना मी घाबरत नाही, भीकही घालत नाही. राजकारणापोटी आर्थिक संस्थेला वेठीस धरु नका, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

”देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, मी जिंकले नाही तर…”

“भारतात बसून अंग मोडून आलं होतं, ती खास विमानंसुद्धा धूळखात पडून होती”

जिंकलेला सामना गमवायची पंजाबला सवय झाली आहे – अनिल कुंबळे

“सव्वा रुपया असो किंवा सव्वा कोटी मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे”

नव्या नवरीचं वागणं पाहून सासऱ्यांना आला ह्रदयविकाराचा झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More