बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बंगालची वाघीण जिंकली म्हणणारे आता मूग गिळून गप्प का आहेत?”

मुंबई | 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली होती. त्यानंतर अनेक जणांनी या हिंसाचाराची निंदा केली आहे. तर भाजप आणि तुणमूल काँग्रेस एकमेकांना या हिंसाचारासाठी जबाबदार ठरवत आहेत. आता या प्रकरणात भाजप आक्रमक भूमिका आहे. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मूग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पण आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम, असंही ट्विट दरेकर यांनी केलं आहे.

दरम्यान, अखेर ममतांचा विजय झाला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाबाधित चुलत भावाच्या अंगावर थुंकल्याचा आरोप, बीडमधील घटनेनं खळबळ

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला- रघुराम राजन

मोदींचे अनुमोदक छन्नूलाल मिश्रांचा भाजपला विसर, घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पंढरपूरची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीवर मोठा खुलासा, राष्ट्रवादी म्हणते ते पत्र खोटं!

रेमडेसिवीर वापराविना 91 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More