मुंबई | मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम 18 नुसार नियुक्ती देण्यात यावी. यासाठी हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल. पण तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाहीतर विधीमंडळाचे सभागृह चालू देणार नसल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेेकर यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्यासाठी सकल मराठा समाज महाराष्ट्रच्यावतीने मागील 2 दिवस आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरु आहे. यावेळी प्रविण दरेकर यांनी गुरुवारी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.
आमच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या अधिनियमानुसार या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतू विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचादरम्यान काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ‘खो’ घातला, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने त्यांना या प्रश्ना संदर्भात लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
…अन फडणवीस म्हणाले तुम्ही पैलवान आहात मी नाही
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महत्वाच्या बातम्या-
राज्यात नव्या 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार? अजित पवार म्हणाले…
कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा
मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील
Comments are closed.