आरारा…रारा.. प्रवीण तरडे भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात?

पुणे | आता भाऊचा बर्थडे बर्थडे न म्हणता प्रवीण तरडे यांच्यासाठी भाजप कार्यकर्ते भाऊचा प्रचार…भाऊचा प्रचार…असं म्हणतील, तर आश्चर्य वाटून घेऊन नका. कारण मुळशी पॅटर्न फेम दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मुळशी मतदारसंघात भाजपाकडून चाचपणी सुरू आहे. प्रवीण तरडे यांना तिकीट देण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत.

‘झी 24 तास’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपकडून याबाबत विचारणा झाल्याचं प्रविण तर्डे यांनी सांगितलं आहे. प्रवीण तरडे सध्या लंडनमध्ये आहेत.

दरम्यान, दोन ते तीन दिवसात भारतात परतणार आहेत. त्यानंतर नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या-