बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

कानपूर | राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत. सीआरपीएफ जवानांच्या कडक बंदोबस्तऻमध्ये कोविंद यांचा दौरा पार पडत आहे. मात्र, रामनाथ कोविंद यांचा कानपूर दौरा दोन जणांच्या जिवावर बेतला आहे. या दौऱ्यामुळे दोन जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये एका तीन वर्षीय चिमुकलीचा तर एका पोस्ट कोव्हीड महिला रुग्णाचा समावेश आहे.

25 जून रोजी सकाळी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यातील एका वेगवान वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवर एक तीन वर्षांची चिमुकली देखील होती. सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीने धडक देताच मुलगी दुचाकीवरुन खाली पडली आणि गाडीच्या चाकाखाली आली. या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

तर दुसरीकडे 25 जून रोजी संध्याकाळी राष्ट्रपतींच्या गाड्यांसाठी गोविंदनगर रेल्वे क्रॉसिंगवर ट्रॅफीक रोखून धरण्यात आलं होतं. यावेळी एका 50 वर्षीय वंदना नावाच्या महिलेला रुग्णालयात हालवलं होतं. मात्र, तब्बल दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने ही महिला वेळेवर रुग्णालयात पोहचू शकली नाही आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची महिती मिळताच रामनाथ कोविंद यांच्यासह त्यांच्या पत्नीने देखील दुःख व्यक्त केलं आहे. तसेच अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, याची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिस आयुक्तांनी देखील संबंधित महिलेच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

“मंत्रिपदासाठी लाचार झालेला नेता आम्हाला नको”; रामदास आठवलेंना घरचा आहेर

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More