बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रतन टाटांकडे दिली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

नवी दिल्ली | टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांच्याकडे मोदी सरकारनं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. पीएम केअर्स फंड बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेकांना विश्वस्त करण्यात आले. त्याचबरोबर सुधा मूर्ती यांचा सल्लागार गटात समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नवनियुक्त विश्वस्त उपस्थित होते.

रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस आणि लोकसभेचे माजी सभापती करिया मुंडा यांच्याकडेही पीएम केअर्स फंडचं विश्वस्तपद देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम केअर्स फंडचे अध्यक्ष आहेत. 2020 मध्ये करोना महामारीदरम्यान पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली. 27 मार्च 2020 रोजी पीएम केअर्स फंड अस्तित्वात आला. अनेक उद्योगपतींनी, उद्योग समूहांनी, सर्वसामान्यांनी यामध्ये भरभरुन दान केलं आहे.

पीएम केअर्स फंड अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर राहिला. पीएम केअर्समध्ये जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब, त्यातील पारदर्शकता यावरून बरीच टीका झाली होती.

थोडक्यात बातम्या- 

ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मोठी बातमी! शिंदे सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More