तिरुवनंतपुरम | केरळमधील महापुरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहिर केली आहे. मोदींनी केरळच्या पूरग्रस्त भागाच्या हवाई सर्वेक्षणानंतर हा निर्णय घेतला आहे.
महापुरात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर पुरात गंभीर जखमी झालेल्या लोकांना 50 हजार रूपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, केरळमध्ये आलेला पूर गेल्या 100 वर्षातील पुरांपेक्षा भयानक मानला जात आहे. या पुरामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा 324 वर पोहोचला आहे. तर 2 लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
Prime Minister Narendra Modi has also announced Rs 500 crore as immediate aid for Kerala, in addition to the 100 crore announced earlier #Keralafloods https://t.co/lvqRnlcEuu
— ANI (@ANI) August 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-केरळला पुण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय; रेल्वेने पाठवणार 7 लाख लिटर पाणी
-तात्काळ मदत मिळाली नाही तर 50 हजार लोकांचा बळी जाईल!
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई
-स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात भव्य मोर्चा
-धक्कादायक! छेडछाडीला विरोध केल्यामुळे दहावीतील मुलीला पेटवलं