बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका, “केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा…”

मुंबई | बाॅलिवूडचे अभिनेते अनुपम खेर हे नेहमी भाजपची स्तुती करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. पण आता त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. त्यांची चक्क एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत.

बिहारमध्ये कोरोनाने मृत्यु झालेल्या रूग्णांचे प्रेत सापडत आहे. या प्रकरणात सरकारवर जी टीका होतेय ती वैध आहे. या परिस्थितीत सरकारने योग्य ते काम करावं. ज्यासाठीच त्यांना निवडून दिलं आहे. देशात आज जी काही परिस्थिती आहे, त्यावर कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेतं यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही, अशी टीका अनुपम खेर यांनी केली आहे.

आपण देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला जाब विचारला पाहिजे, असंही खेर म्हणाले. आपल्या भावना योग्यवेळी व्यक्त केल्या पाहिजेत, असं वक्तव्य अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रातील सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून आता स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीच्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, काश्मिर मुद्यावरून अनुपम खेर अनेक वेळा भाष्य करताना दिसतात. कलम 370 रद्द केल्यानंतर अनुपम खेर यांनी भाजपचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तेव्हापासून ते भाजपच्या विचारांशी जवळीक आहेत.

थोडक्यात बातम्या-

लग्नानंतर पाचच तासात नवरीला मृत्यूनं गाठलं, नवरदेवानं दिला मुखाग्नी

“देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॅाकडाऊन लावण्यात यावा”

“कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल”

काळ्या बुरशीचा धोका वाढला; मास्क वापरताना ‘या’ गोष्टी करणं पडू शकतं महागात!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द; मॅटकडून मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More