नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर पोहचले असून त्यांनी शहिदांना आदरांजली वाहिली.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाच्या सैन्याची ताकद पाहायला मिळणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी भारतीय हवाई दलात नव्याने सामील झालेली राफेल विमानही परेडमध्ये प्रात्यक्षिके करताना दिसणार आहे. यासोबतच टी-90 टँक आणि सुखोई-30 एमके आय लढाऊ विमानंही या संचलनात सामील असतील.
सरंक्षण मंत्रालयकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे रथ पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड करणार आहे.
थोडक्यात बातम्या-
आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर
शेतकरी जनसंवादादरम्यान सिंघू सीमेवर काँग्रेसच्या ‘या’ खासदारावर प्राणघातक हल्ला
सर्वांसाठी लोकल लवकरच होणार सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पद्मश्रीसाठी संजय राऊतांच्या नावाची ठाकरे सरकारने केली होती शिफारस
हेच का आपलं प्रजासत्ताक? केंद्र सरकारनं एक पाऊल मागं घेतलं असतं तर…