बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दरवाढीवरून PM मोदींनी महाराष्ट्राला सुनावलं, म्हणाले…

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या दरांवर अंकुश ठेवण्याऐवजी पंतप्रधाना नरेंद्र मोदींनी बिगरभाजप शासित राज्यांना खडेबोल सुनावले आहेत. देशात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालने इंधनाचे दर कमी करावेत, असं म्हटलं आहे. राज्यांनी किती महसुल कमावला हे मला सांगायचं नाही. परंतु, देशहितासाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्हॅट कमी करायला हवेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांनी कोणतेही कारण दाखवून केंद्र सरकारच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क कमी केले होते. राज्यांनाही शुल्क कमी करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी सामान्य नागरिकांना दिलासा दिला नाही, असं पंतप्रधानांनी सुनावलं आहे.

दरम्यान, कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि जयपुर येथे इंधनाचे जास्त आहेत. दीव आणि दमण येथे इंधनाचे दर कमी आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा अशी विनंती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“…नाहीतर त्याच ठिकाणी किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”

“सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर राऊतांनाच भूमिका मिळाली असती”

…तर 123 कोटी लोकांचा रक्तगट बदला -संभाजी भिडे

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ गंभीर कारण, म्हणाले….

तुरूंगातून बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More