बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेने राजकीय वर्तुळात उडी घेत थेट मोदींबद्दल एक भाकीत केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माझ्या आजच्या अंदाजानुसार पंतप्रधान मोदीजी 2024 मध्ये क्लीन बोल्ड बाद होणार आहेत, असं ट्विट केआरकेनं केलं आहे. केआरकेचं हे ट्विट खूप वेगानं व्हायरल होत आहे. नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

कमाल रशीद खान नेहमीच आपल्या अभिनयापेक्षा बेसुमार वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतो. यामुळे नेटकऱ्यांनी कित्येकवेळा त्याला ट्रोल देखील केलं आहे. मात्र, केआरकेला याचा काहीही फरक पडत नाही. तो सतत सोशल मीडियावर बेसुमार वक्तव्य करत असतो.

दरम्यान,  केआरकेचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केआरके अशी बेसुमार वक्तव्य करतो, असा आरोप नेटकरी केआरकेवर लावत असतात.

थोडक्यात बातम्या – 

“…तर मी बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो”

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

निर्वासित मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 31 जुलैपर्यंत ‘वन नेशन वन रेशन’ योजना लागू करा!

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More