बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पंतप्रधान मोदींनी घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनाचा (Corona Virus) प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसत असताना देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. दिल्ली व उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

दिल्ली व उत्तर प्रदेशातून समोर येणाऱ्या आकडेवारीने सर्वांची चिंता वाढवली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे.

कोरोनाची वाढती आकडेवारी बघता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असून ते राज्यांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याबाबत आवाहन करू शकतात. तर कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही निर्बंध लादण्याबाबतची चर्चा देखील या बैठकीत होऊ शकते.

दरम्यान, महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, दिल्लीतील वाढत्या कोरोना केसेसमुळे मास्कसक्तीसह अनेक निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मास्कसक्ती होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पंतप्रधान मोदी बुधवारच्या बैठकीत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“बाजारात नवी ऑफर, ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा”

“…आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो”

“…त्यामुळेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला”

मोठी बातमी! भायखळा तुरूंगात नवनीत राणांची तब्येत खालावली

IPL 2022: कृणाल पांड्याची विकेट अन् पोलार्डचं हटके सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More