बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत रशिया पंतप्रधानांची आज भेट; मोदी-पुतिन भेटीकडं जगाचं लक्ष

नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षांपासून भारत जागतिक दहशतवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित करत होता. माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशदवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. याचा फायदा आता भारताला होताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला मोठा मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

आज संध्याकाळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या बैठकीत रशियाचे पंतप्रधान ब्लादिमिर पुतिन देखील सहभागी होणार आहेत. त्यातच आता मोदी आणि पुतिन यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता मोदी आणि पुतिन यांची भेट होईल.

रशिया हा भारताचा पारंपारिक मित्र आहे. रशियाने अनेकदा भारताला युद्धाच्या आणि शांततेच्या काळात मदत केली आहे. आता या बैठकीचं अध्यक्षपद भारताकडे असताना आता रशिया दहशदवादाच्या मुद्द्यावर कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत परराष्ट्रमंत्री आणि संयुक्त राष्ट्र समितीचे प्रतिनिधी टी एस तिरूमुर्ती हे देखील उपस्थित असतील.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून भारताला स्थायी सदस्य देण्याची मागणी केली जात आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य नाही. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देशांचा समावेश आहेत. त्यापैकी 10 अस्थायी तर, 5 स्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत.

थो़डक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

चिंताजनक! आता डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना अधिक धोका

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक; तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची हजेरी

“‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ नामकरण ही लोकभावना नसून राजकीय खेळ”

“शिवसेना उद्या UPA मध्ये गेली तरी आश्चर्य वाटणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More