जयपुर | गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. याचमध्ये आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजस्थानमधील तमाशा बंद करावा, असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, “नरेंद्र मोदींना जनतेने पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सध्या राजस्थामध्ये जो काही तमाशा सुरु आहे तो त्यांनी बंद करावा.”
विधानसभेचं अधिवेशन घेण्यासंबंधीची घोषणा झाल्यानंतर घोडेबाजाराला उत आलाय. सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीचा खेळ सुरु आहे. या सगळ्या मागे भाजपच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनींच हा सगळा तमाशा आणि घोडेबाजार बंद करावा असं म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केलीये.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधी 10 कोटी रु. असलेली किंमत आता 15 कोटी रु. झालेली आहे, असं अशोक गेहलोत यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी…., राज्यपालांची महत्त्वाची सूचना
“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”
अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस
राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
Comments are closed.