मुंबई | काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात मात्र आंदोलन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
‘मन की बात’ या कार्यक्रमात किंवा भाषणात मोदी चांगलं-चांगलं बोलतात मात्र प्रत्यक्षात काही करत नाहीत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एक फोन करा असं पंतप्रधान मोदी म्हणतात मात्र फोन केल्यावर प्रत्यक्षात पंतप्रधान कार्यालयात फोन उचला जात नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अंबरनाथ भागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. कारण इथले रस्ते आमचं सरकार असताना झाले आहेत. याआधी देशात काहीच झालं नाही जे झालं ते गेल्या सहा वर्षात झालं, असं केंद्र सरकार सांगत आहेत. मात्र मागील पाच वर्षात अंबरनाथमधील कंपन्या बंद पडल्या. पण सरकारने नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मुलांच्या मुळावर उठणारा कामगारांच्या विरुद्ध कायदा केला, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
दरम्यान, ईडीची नोटीस शरद पवारांना येताच राज्यात गेम चेंज झाला असून त्यावेळी महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी उभी होती. त्याचदरम्यान साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्रातील चित्र बदल्याचं सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर
“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”
“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”
‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं
रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती!