बीड | भाजपचा राज्यात टाकाऊपासून टिकाऊपर्यंतचा प्रवास उल्लेखणीय आहे. या प्रवासात सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळेच भाजप हा पक्ष महाराष्ट्रात टिकाऊ झाला आहे, असं बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.
पूर्वीच्या अनुभवातून तुम्ही ज्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांना उभं करण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. गुळाचा तो उपयोग आहेच पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा भाजप पक्षाचं काम आपल्या कुटुंबाने केलं असल्याचं प्रीतम मुंडेंनी सांगितलं.
त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष टिकाऊ झालल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी ग्रांमपंचायतीच्या निकालांवरही भाष्य केलं.
दरम्यान, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष फुललेला दिसत आहे. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. जसं पक्षाचं भविष्य उज्ज्वल आहे तसंच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल आहे, असं मुंडे म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
‘देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
“लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?”
गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…- चंद्रकांत पाटील
भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…
रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली