बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

याला म्हणतात अभ्यास… मोदींच्या आकड्यासोबत पृथ्वीबाबांचा आकडा बरोबर जुळला

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आज खास विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजनूसार तब्बल २० लाख कोटी रुपये कोरोनाशी सामना करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत ही रक्कम भारताच्या जीपीच्या जवळपास १० टक्के आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या पॅकेजची रक्कम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीसोबत तंतोतंत जुळली आहे. नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी जीडीपीच्या १० टक्के म्हणजेच २१ लाख रुपये कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी केली होती.

कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने याआधी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा केली होती. हे पॅकेज अत्यल्प असल्याची टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी केली होती.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी तंतोतंत खरी ठरली आहे. मोदींनी नुकतीच जाहीर केलेली मदत त्यांच्या अपेक्षेनूसार आहे, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या अभ्यासूपणाची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी

आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More