लग्नानंतर प्रियांकानं नाव बदललं, पाहा काय आहे नवीन नाव…

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली आणि देसी गर्ल म्हणून अोळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या नावात बदल केला आहे. तिने इन्स्टाग्रामवरील नावात बदल करत ‘प्रियंका चोप्रा जोनास’ असे लिहिले आहे.

लग्नानंतर प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच झऴकताना दिसत आहे. तिने नावात बदल करत आपल्या सासरच्या नावाचा समावेश केला आहे. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. राजस्थानमधील जोधपूर येथे हॉटेल उमेद पॅलेसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.

दरम्यान, दिल्लीमध्ये तिने ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देखील दिली होती. या पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या-

-रस्ते नीट दिसले नाहीत तर काॅन्ट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन- गडकरी

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ