बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका

ढाका | बांग्लादेशच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आपण बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी तुरूंगात गेलो होतो, असं वक्तव्य नरेंद्र मोदी केलं होतं, यावरून सोशल मीडियाद्वारे मोदींवर चांगलीच टीका होत आहे. आता शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदीवर टीका केली आहे.

1971 मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकासारख्या देशाने केलेल्या विरोधाचा सामना करून बांग्लादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. मला प्रश्न पडला आहे की, सर्व भारतीय जर एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज आहे? यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की, 1971 संदर्भात आपल्याला आणखी माहिती मिळेल, असं ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे.

बांग्लादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी 20 ते 22 वर्षांचा असेल. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांग्लादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. तेव्हा मलाही अटक झाली होेती ते माझं पहिलं आंदोलन असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सावर येथे एका भाषणात सांगितलं होतं.

दरम्यान, बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्याच्या 50व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आलं. या गौरवशाली सोहळ्यात मला सहभागी होता आलं, हे माझं भाग्य समजत असल्याचं, नरेंद्र मोदी म्हणाले होते. तर मोदींच्या या वक्तव्यावरून नेटकरी सोशल मीडियावर मोदींना भरपूर ट्रोल करत आहेत.

पाहा ट्विट –

 

थोडक्यात बातम्या-

मनसुख हिरेनच्या पोस्टमार्टमपूर्वी सचिन वाझेंनी घेतली होती डाॅक्टरांची भेट; NIA च्या हाती लागली ‘ही’ माहिती

आलिया भट्टच्या आईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टांगती तलवार; फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीची शक्यता

‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More