मुंबई | भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असं आश्वासन देण्यात आलं आहे. याचा अर्थ भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का, असा सवाल शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.
भाजपकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचं प्रमुख आश्वासन असल्याचं यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. यावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.
कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का?, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला विचारला.
दरम्यान, कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाकारणं म्हणजे कायद्यालाच आव्हान देण्यासारखं आहे”
…म्हणून सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री- अनिल देशमुख
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले…
“बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”